साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेच्या 65 लाभार्थीची चिठ्ठीव्दारे निवड
सोलापूर : (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत आर्थिक व भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मंजूर अर्जदारांपैकी ६५ लाभार्थीची निवड चिठ्ठी पध्दतीने करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.टी.शिंदे यांनी दिली.
बहुउद्देशिय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समितीच्या अध्यक्षा शमा पवार, विशेष समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे सदस्य सचिव,अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवड प्रक्रियेमध्ये 321 अर्जदारांमध्ये 60 पैकी 32 महिला अर्जदार व एकूण 261 पैकी 33 पुरुष अर्जदार अशा प्रकारे एकूण 65 अर्जदारांची निवड चिठ्ठीव्दारे करण्यात आली. तसेच निवड झालेल्या अर्जदारांपैकी कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या व
कर्ज योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक नसलेल्या अर्जदारानंतर कर्ज वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी,प्रतिक्षा सुची तयार करण्यात आली आहे. यामध्ये महिला 6 व पुरुष 6 अशी प्रतिक्षा सूची असून प्रतिक्षा सुचीतील अर्जदारांची निवड सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक टी.आर.शिंदे यांनी महामंडळाच्या थेट कर्ज योजने संदर्भात सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन राहुल आळसांदे यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य नितीन कांबळे यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक प्रशांत तेलंग यांनी आभार मानले.


0 Comments