google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा सावत्र आईकडून खून ....

Breaking News

पुण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा सावत्र आईकडून खून ....

 पुण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा सावत्र आईकडून खून ....

पुणे : पुण्यातील शिवणे भागात  ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली असून, महिन्याभरापूर्वीच वडिलांशी विवाह करून आलेल्या सावत्र आईने 5 वर्षीय चिमुकलीचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

 मुलगी त्रास देत असल्याने तिला चटके देऊन तसेच तिचे डोके आपटून  जीव घेतला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, डॉक्टरांकडे मुलीला नेल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. पोलिसांनी तात्काल या क्रूर आईला अटक केली.

श्वेता राजेश आनंद (वय 5) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रितीका राजेश आनंद (वय 26, रा. अहिरेगेट, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्या या क्रूर आईचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार घोलप यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आनंद हे एका खासगी ठिकाणी रोजंदारीने काम करतात. दुर्दैवाने नुकतेच त्यांच्या पत्नीचे मृत्यू झाला आहे. त्यांना श्वेता ही एकच मुलगी आहे. दरम्यान, त्यांची व रितीका यांची ओळख झाली होती. त्यांनी पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांनी रितीकासोबत दुसरा विवाह केला.

जानेवारी महिन्यातच रितीका व राजेश यांनी विवाह केला होता. त्यानंतर ते शिवणेमधील अहिरेगेट येथील एका रूममध्ये राहत होते. दरम्यान, श्वेता त्यांना त्रास देत होती. ती ऐकत नव्हती. त्यामुळे रितीका यांनी तिला चटके दिले. तर, तिच्या डोक्यात मारून तसेच तिचे डोके खाली व कपाटावर आपटले.

 यात ती गंभीर जखमी झाली व बेशुद्ध पडली. रितीका हिने लागलीच श्वेताला ससून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यांनी संशयास्पद वाटल्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

उत्तमनगर पोलिसांनी ससून रुग्णालय गाठत माहिती घेण्यास सुरूवात केली. रितीका हिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने त्रास देत असल्यावरून मारल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदकरत तिला अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर हे तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments