पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने...
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार पिंपरी परिसरात उघडकीस आलेला असून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आलेले आहेत.
पीडित तरुणीचे वय तीस वर्षे असून 2018 पासून तर 2023 पर्यंत हा प्रकार आपल्यासोबत सुरू होता असे तक्रारदार तरुणीचे म्हणणे आहे.
चिखली पोलिसात दाखल होत पीडित तरुणीने पोलिसात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी असलेला दिलीप कल्लप्पा बजंत्री (वय ३३ रा.सलगर मंगळवेढा सोलापूर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यास आरोपी व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
तब्बल पाच वर्ष तक्रारदार व्यक्ती यांच्यासोबत हा प्रकार सुरू होता त्यानंतर अखेर आरोपीने त्यांना लग्नाला नकार दिला. आरोपी लग्नाला नकार देऊन फसवणूक करत आहे असे तरुणीने म्हटलेले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


0 Comments