google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यास सुरुवात

Breaking News

आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यास सुरुवात

 आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यास सुरुवात

"आमदार आपल्या दारी" माध्यमातून आज ११ गावातील शेतकऱ्यांना थेट भेटणार
 

सांगोला : तालुका प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेले सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील या दोन आजी-माजी आमदारांनी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब रुपनर यांनी शुक्रवार (ता. २०) पासून "आमदार आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत गाव भेट दौऱ्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

 विशेष म्हणजे प्रत्येक विभागाच्या प्रमुख अधिकारी सोबत हा दौरा असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्याच गावात सोडविण्यावर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे. 

  शुक्रवार (ता. २०) जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी सकाळी ९ वा. या दौऱ्याची सुरुवात नराळे या गावातून होईल आज दिवसभर नराळे, डिकसळ, पारे, हंगीरगे, घेरडी, वानीचिंचाळे, वाकी घे, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव आणि राजापूर. 

शनिवार (ता. २१) रोजी वाकी शिवणे, नरळेवाडी, शिवणे, एखतपुर, सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मी नगर, अचकदानी, लोटेवाडी, खवासपूर, इटकी, कटफळ, शेरेवाडी या गावांचा तर सोमवार (ता. २३) रोजी 

चिंचोली, धायटी, हलदहिवडी, शिरभावी, मेटकरवाडी, संगेवाडी, मेथवडे, देवळे, बामणी, मांजरी व देवकरवाडी गावांचा दौरा केला जाणार आहे. गावातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. "आमदार आपल्या दारी" हा आजी - माजी आमदारांचा दौरा सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत चालणार आहे.

 या दौऱ्यात आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब रुपनर यांच्यासह तहसीलदार अभिजीत पाटील,  गटविकास अधिकारी आनंद लोकरे, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी समोर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मांडाव्यात आणि न्याय मिळवावा असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments