बायको ने नवऱ्याची कापली जीभ आणि ……
नवरा बायको मध्ये भांडण ही काही नवीन बाब नाही. पण हेच भांडण जर पराकोटीला गेले तर त्याचे काय परिणाम होतील हे सांगता येत नाही. अशीच घटना उत्तर प्रदेश च्या लखनऊ शहरात घडली आहे. बायको आणि मुलांना घ्यायला सासुरवाडीत गेलेल्या नवऱ्याची बायकोने जीभ कापल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
लखनऊ (उत्तरप्रदेश) : ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. त्यामुळे नाराज असलेली पत्नी तिच्या माहेरच्या घरात राहत होती. शुक्रवारी पती पत्नी व मुलांना घेण्यासाठी माहेरी पोहोचला असता पत्नीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. यादरम्यान दोघांमध्ये भांडण वाढले आणि संतापलेल्या पत्नीने पतीची जीभ दाताने चावली.
चावल्यानंतर त्याची जीभ लगेच तुकडा होऊन खाली पडली. अचानक झालेल्या या प्रकाराने पती जखमी होऊन तेथेच पडला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासोबतच आरोपी पत्नीला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुन्ना नावाच्या इसमाचे लग्न ठाकुरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सलमा नावाच्या तरुणीशी झाले होते. पण या पती – पत्नीत नेहमी खटके उडत होते. त्यामुळे भांडण झाले की सलमा आवल्या मुलांना घेऊन माहेरी निघून जात होती.
त्याम्च्यात अनेक वेळा आपसी समझोता सुद्धा झाला.पण प्रत्येक वेळी त्यांच्यात भांडण होत होते. काही दिवसांपूर्वी मुन्ना आणि सलमा मध्ये पुन्हा भांडण झाले त्यानंतर सलमा आपल्या मुलना घेऊन माहेरी निघून गेली.
मुन्ना सलमा आणि।मुलना आणण्यासाठी सलमाच्या माहेरी गेला असता. सलमा ने सासरी जाण्यास नकार दिला त्यामुळे पुन्हा दोघात कडाक्याचे भांडण झाले या दरम्यान सलमाने मुन्ना च्या जिभेचा इतक्या करणे चावा घेतका की मुन्ना च्या जिभेचा एक तुकडा खाली पडला. त्यानंतर मुन्ना खाली पडला. पोलिसांना घनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठून सलमा ला अटक केली.


0 Comments