google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात महसूल प्रशासनात खळबळ लाखाची लाच घेताना मंडलाधिकारी रंगेहात पकडला

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात महसूल प्रशासनात खळबळ लाखाची लाच घेताना मंडलाधिकारी रंगेहात पकडला

सोलापूर जिल्ह्यात महसूल प्रशासनात खळबळ  लाखाची लाच घेताना मंडलाधिकारी रंगेहात पकडला 

तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पंढरपूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि एक खाजगी व्यक्ती आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा केला जातो तसेच विविध गौण खनिजाची देखील चोरी होत असल्याचे आणि त्याद्वारे शासनाला मोठा चुना लावला जात असल्याची चर्चा नेहमीच सुरु असते. 

महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांकडे याबाबत बोट देखील दाखवले जाते. आज मात्र अशाच गौण खनिजाच्या संदर्भात महसूल विभागातील मंडल अधिकारी आणि एक खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे.

 लाच प्रकरणी दोघे अडकल्याने महसूल विभागातील कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे तर लाचखोर मंडळींचे धाबे दणाणले आहेत. जनतेतील चर्चेला देखील या घटनेने दुजोरा मिळाला आहे. 

पंढरपूर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी रणजीत मारुती मोरे (औदुंबर नगर, पंढरपूर) आणि पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील खाजगी व्यक्ती शरद रामचंद्र मोरे यांनी तक्रारदारांकडे तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारलीही आहे. मुरूम उत्खननाबाबत तक्रारदार यांनी  भाडे तत्वावर घेतलेला आहे. 

हा जेसीबी १५ जानेवारी रोजी ताब्यात घेवून, तक्रारदार यांच्या टिपर, ट्रकमधून चोरीच्या मुरुमाची वाहतूक झाली आहे असे सांगून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल न  करण्यासाठी तसेच दंड न आकारण्यासाठी आणि कारवाई न करता जेसीबी सोडण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. 

तक्रारदारांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून आपली तक्रार दिली, या तक्रारीनुसार सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज २० जानेवारी रोजीच पडताळणी केली आणि या पडताळणीत सदर लोकसेवकाने लाचेची मागणी केली असल्याचे आढळून आले. यानंतर मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली आणि या सापळ्यात लाचखोर रंगेहात सापडले आहेत.

 सदर एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याबद्धल  मंडलाधिकारी रणजीत मारुती मोरे आणि पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील खाजगी व्यक्ती शरद रामचंद्र मोरे या दोघांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

लाचखोरीच्या घटना सतत घडत असून आणि अनेक लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले जात असतानाही शासकीय सेवकांना लाचेचा मोह सुटताना दिसत नाही.

 शासन गलेलट्ठ पगार देत असतानाही लाचेला चटावलेल्या लोकसेवकामुळे सामान्य जनतेला वेठीला धरण्यात येते त्यामुळे अशा कारवाईचे नागरीकातून नेहमीच स्वागत होत आहे.  महसूल विभागातून काही लाचखोर कशा प्रकारे अर्थाजन करतात याचे बोलके उदाहरण आज पुन्हा समोर आले आहे. या कारवाईचे जनतेतून स्वागत होत असून लाचाखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments