google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुंबई ते सोलापूर मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार

Breaking News

मुंबई ते सोलापूर मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार

 मुंबई ते सोलापूर मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत एका समुदायाच्या कार्यक्रमासाठी मोदी 10 फेब्रुवारी रोजी येणार आहेत. त्यावेळी सीएसएमटी येथे 15 मिनिटांच्या कार्यक्रमात मोदी यांच्याकडून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

10 फेब्रुवारीला मोदी मुंबई दौऱ्यावर येणार असून सीएसएमटी येथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. सीएसएमटी-साई नगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास 55 मिनिटांचा प्रवास होणार आहे. 

सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता आठवड्यातील 6 दिवस धावेल. सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी सुटून दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.

Post a Comment

0 Comments