अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सांगोला व एसटी आगारातर्फे प्रवासी दिन साजरा
सांगोला (उत्तम चौगुले):- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने प्रवासी वर्गासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करून दिल्या
असून प्रवासी वर्गाने आजच्या काळात सुरक्षित व सुखकारक प्रवास म्हणून खाजगी वाहतुकीपेक्षा विना अपघात सुरक्षित प्रवास देणारे एसटी सेवा ही आपली समजून यापुढील काळात एसटी प्रवासालाच प्राधान्य द्यावे असे आवाहन ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक श्री नागेश जोशी यांनी बोलताना प्रवासी जनतेला केले.
**प्रवासी वर्गाने एसटी प्रवासालाच प्राधान्य द्यावे विना अपघात सुरक्षित प्रवास ** पत्रकार नागेश जोशी.
प्रवासी दिन 'रथ सप्तमी' निमित्त सांगोला तालुका ग्राहक पंचायत व सांगोला एसटी आगार यांचे संयुक्त विद्यमाने सांगोला एसटी स्टँडवर प्रवासी दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आगार प्रमुख देशमुख साहेब हे होते
उपस्थितांचे स्वागत ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी करून गरजा महाराष्ट्र माझा हे स्फूर्ती गीत सादर करून कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला यावेळी एसटीने प्रवास करणाऱ्या महिला व पुरुष वर्गाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रवासी जनतेला या पुढील काळात चांगली सेवा देऊन आपल्या असणाऱ्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू
व मंगळवेढा मार्गे सांगोला सोलापूर पूर्वीप्रमाणे बस सेवा सुरू करण्याचा लवकरच प्रयत्न करू असे आश्वासन आपल्या भाषणात आगार प्रमुख देशमुख साहेब यांनी दिले .सांगोला एसटी आगारातर्फे ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .आभार समारोप ग्राहक पंचायतीचे संघटक डॉक्टर मानस कमलापूरकर यांनी केला .
या समारंभास ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष उत्तमराव चौगुले प्रसिद्धीप्रमुख हमीद बागवान एसटी आगार पर्यवेक्षक शिंत्रे मॅडम यांचे सह एसटी आगाराचे चालक वाहक कर्मचारी व ग्राहक पंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रवासी जनतेला तिळगुळ वाटप व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता प्रवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आली.


0 Comments