पुढचे पंतप्रधान नितीन गडकरी असतील? शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठे विधान
पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणता नेता न्याय देऊ शकतो, त्यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
सध्या देशाला मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असे विधान आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.
आमदार शहाजी बापू पाटील यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळेच महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत आहेत.
त्यामुळे शिंदे गटाला वंचित आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेच्या युतीचा फटका बसणार नाही. आजपर्यंतचे सर्व सर्व्हे चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे लोकसभेत शिंदे आणि फडणवीस यांच्या उमेदवारांना चांगले बहुमत मिळेल, असा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.


0 Comments