एकनाथ शिंदेंचे मुख्यनेतेपद घटनाबाह्य, ठाकरे गटाकडून आयोगाला भक्कम कागदपत्रे
शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण कुणाचा? यावर निवडणूक आयोगात आज महत्त्वाचा दिवस मानला जातोय. आयोगाकडून शिंदे गट तसेच ठाकरे गटाला आपले लिखित म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. आज दोन्ही गटांकडून लिखित स्वरूपात युक्तिवाद सादर करण्यात आला आहे.
शिवसेना पक्षातील बंडखोरीचा घटनाक्रम तारखेसह ठाकरे गटाकडून उत्तरात मांडण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे बंड केले, हे मेलद्वारे उत्तरात मांडण्यात आल आले असून शिंदे यांचे मुख्यनेते पद घटनात्मक नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
बंड केलेल्या चाळीस आमदारांना शिवसेनेची घटना आधी मान्य होती पण नकोशी का वाटत आहे? असा प्रश्न ठाकरे गटाने लिखित उत्तरात केला आहे.दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा केला आहे.
शिवसेना पक्ष कोणाचा याबाबतची कागदपत्रे ठाकरे गटाकडून देण्यात आलेले आहेत. ही कागदपत्रे अतिशय भक्कम आहेत, जे पदाधिकारीचं नाहीत त्यांची बोगस कागदपत्रे शिंदे गटाकडून देण्यात आलेली आहेत.
कागदोपत्री शिवसेना ठाकरे गट भक्कम असल्याने निर्णय कोणाच्या बाजूने द्यायचा, याचा विवंचनेत निवडणूक आयोग असेल. जसे गांधी आणि काँग्रेस वेगळे होऊ शकत नाहीत, तसेच ठाकरे आणि शिवसेना कधीच वेगळी होऊ शकत नाही, असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.


0 Comments