ब्रेकिंग न्यूज.. रामदास आठवले शिंदेंवर नाराज ; मोठा निर्णय घेणार?
शिंदे गटात आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. या वादात आणखी एक ठिणगी पडत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
या सगळ्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत असतानाच, आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. कारण शिंदे गट-भाजपच्या युतीला पाठिंबा देणारा रिपाई पक्ष आता या युतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज आहेत.
शिंदेंनी गेल्या आठवड्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत युती केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे आणि शिंदेंनी पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. या युतीमुळे आठवले नाराज आहेत. तसे त्यांनी स्पष्ट बोलूनही दाखवले आहे.
आठवले म्हणाले की, कवाडे यांनी शिंदे गटाशी केलेल्या युतीमुळे आम्हाला काही हरकत नाही. पण कवाडे यांना शिंदेंनी महायुतीत घेतल्यास आमचा विरोध असेल. कवाडे यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. एक राजकीय पक्ष म्हणून ते शिनसेनेसोबत युती करू शकतात. पण महायुतीत हा पक्ष असू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


0 Comments