धक्कादायक दिरानेच केला भावजयचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील घटना...
तु मला आवडतेस असे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल
एका 32 वर्षीय विवाहित महिला स्वयंपाक करीत असताना तीच्या घरी जावून तु मला खूप आवडतेस असे म्हणून तीचा पदर ओढून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्रू केल्याप्रकरणी
येथील आरोपी भारत महादेव शिंदे (रा.आंधळगांव) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी तथा पिडीत विवाहित महिला ही दि.24 रोजी सकाळी 9.00 वा.तीच्या घरी स्वयंपाक करीत असताना
आरोपी भारत शिंदे याने येवून तुझा नवरा कुठे गेला आहे अशी विचारणा करीत तु मला खूप आवडते असे म्हणत पदर ओढून पाठीवरून हात फिरवून अंगाशी झोंबाझोंबी करत तीच्या मनाला लज्जा असे कृत्य केले. यावेळी पिडीतेने आरोपीस तुम्ही असे का करता असा जाब विचारला. तसेच ही घटना तु बाहेर कोणाला सांगितली तर तुला सोडणार नाही असे म्हणाला.
पिडीतेने यावेळी आरडाओरडा करीत घराबाहेर आले असता आवाज ऐकून तीचे नातेवाईक तिथे आले. यावेळी त्यांनाही आरापीने शिवीगाळी, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक काळे हे करीत आहेत.


0 Comments