पाणीपुरी खाल्ली उधारीचे 20 रुपये परत मागितले म्हणून पाणीपुरी वाल्याच्या पोटात खुपसला सुरा घडला थरारक गुन्हा
नागपूर - पाणीपुरी विक्रेत्याकडून चिकन विक्रेत्याने 20 रुपयांची पाणीपुरी खाल्ली मात्र पैसे नंतर देणार असे म्हणत तो निघाला.
दुसऱ्या दिवशी पाणीपुरी विक्रेत्याने 20 रुपये मागितले असता चिकन विक्रेत्याला याचा राग आला त्याने चिकन कापण्याचा सुरा आणत पाणीपुरी वाल्याच्या पोटात खुपसला. या घटनेमुळे नागपुरातील जरीपटका परिसर हादरला असून पोलिसांनी आरोपी चिकन विक्रेत्याला अटक केली आहे.
जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पीडित हा पाणीपुरी चा ठेला लावत आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, त्याच्या बाजूला चिकन विक्री चे दुकान आहे, दुकान चालकाने 20 रुपयांची पाणीपुरी उधारी मध्ये खाल्ली, दुसऱ्या दिवशी उधारीचे पैसे मागितले असता चिकन विक्रेत्याने कोंबडी कापण्याचा सूरा पाणीपुरी विक्रेत्यांच्या पोटात खुपसला.
या हल्ल्यात पाणीपुरी वाला गंभीर जखमी झाला होता, रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली पडल्याने आरोपीने तिथून पळ काढला, मात्र जरीपटका पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. क्षुल्लक वादात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत माजली आहे


0 Comments