१ जानेवारी २२ ते ५ जानेवारी २३ या कालावधीमध्ये शहर व तालुक्यातील ९ हजार ५५३ नागरिकांची नव्याने मतदान नोंदणी
१८ वर्षांपुढील नागरिकांनी मतदान नोंदणी करून घ्यावी : अभिजीत पाटील
सांगोला / १ जानेवारी २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये सांगोला शहर व तालुक्यातील ९ हजार ५५३ नागरिकांनी मतदान यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी केली आहे. १८ वर्षावरील नागरिकांनी आपल्या मतदानाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी केले आहे.
सांगोला तहसील कार्यालय अंतर्गत निवडणूक विभागाच्या वतीने नुकतीच मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नवीन मतदार यादी मध्ये नाव नोंदणी केलेल्या ९ हजार ५५३ नागरिकांची नावे नव्याने वाढविण्यात आले आहेत.
५ हजार १८४ मतदारांची नव्याने दुरुस्ती करण्यात आली आहेत. तर मयत मतदारांची संख्या ४ हजार ८३० इतकी आहे. यामध्ये ८२ मतदारांनी स्थलांतर केले आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३ लाख ८ हजार ६७० मतदार असून यापैकी २ लाख २६ हजार ६०२ मतदारांनी आधार जोडणी केलेली आहे. ५ जानेवारी रोजी नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार मतदार यादी नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांसाठी तलाठी कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
सांगोला तालुक्यात अठरा वर्षांपुढील नागरिकांसाठी गाव स्तरावर बीएलओ यांच्यामार्फत तर तहसील कचेरी मध्ये निवडणूक विभागात नवीन मतदार यांची नाव नोंदणी सुरू आहे.
अठरा वर्षांपुढील नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट करावे या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील नागरिकांनी आपले नावाची नोंदणी केली होती.
यापुढील काळात ही नवीन नाव नोंदणी सुरू असून नूतन मतदारांनी आपले नाव मतदान यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठी नजीकच्या निवडणूक शाखेत अर्ज सादर करावेत असे आवाहन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी केले आहे. सदर नाव नोंदणीसाठी निवडणूक शाखेचे अमोल देशमुख व अण्णासो सरगर हे काम पाहत आहेत.


0 Comments