google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवणे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे यांचा नागरी सत्कार गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ.शहाजीबापु पाटील दिपक आबा साळुंखे पाटील

Breaking News

शिवणे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे यांचा नागरी सत्कार गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ.शहाजीबापु पाटील दिपक आबा साळुंखे पाटील


 
शिवणे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही :

आ. पाटील शिवणे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे यांचा नागरी सत्कार

सांगोला / प्रतिनिधी शिवणे गावावरून जाणारा रस्ता सर्व सोयींनी युक्त, समृध्दी महामार्गाच्या तोडीचा होणार असून येणाऱ्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करावा.

पहा कार्यक्रमाच्या संपूर्ण व्हिडिओ....


 नागरिकांच्या अडचणी लक्षात घेवून आरोग्य, स्वच्छता, अंतर्गत रस्ते इत्यादी सर्व कामांसाठी दीपक साळुंखे व मी कसलाच निधी कमी पडू देणार नाही. असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे यांच्या नागरी सत्कारावेळी

व्यक्त केला. रविवार दि. ८ जानेवारी रोजी शिवणे नागरिकांच्या वतीने सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. दीपक साळुंखे पाटील, चेतनसिंह केदार, सागर पाटील, दादासाहेब लवटे, विश्वनाथ चव्हाण विलास घाटसुभाष इंगोले, विजय बनसोडे, योगेश खटकाळे, विजय पवार, सुनील भोरे आदी उपस्थित होते.

 शिवणे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी दादासाहेब घाडगे यांचा ३५६ मतांनी विजय झाला. यानिमित्त सुरुवातीला नूतन सरपंच दादासाहेब घाडगे उपसरपंच उदयसिंह घाडगे, सदस्य नामदेव घाडगे, भाटेकर, छाया घाडगे, प्रियांका शेळके, सुनीता घाडगे कसम घाडगे कामिनीघाडगे या नूतन सदस्यांचा सत्कार आ. शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेतनसिंह केदार, सागर पाटील, दादासाहेब लवटे, विश्वनाथ चव्हाण, विलास घाडगे, सुभाष इंगोले, विजय बनसोडे, विजय पवार, अँड. दिग्विजय पाटील, योगेश खटकाळे, दीपक खटकाळे, सुनील भोरे, सोमेश यावलकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments