सांगोला पोलीस प्रशासनाने यात्रेत भोंगे वाजवणाऱ्या विरोधात कडक पावले उचलावीत कारवाई करावी
मागील दोन ते तीन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सांगोल्याचे यात्रेत चांगलेच रंग भरू लागले आहेत. यात्रेकरूकडून या सांगोला यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना, यात्रेकरूंना भोंग्यांचा त्रास चांगला सतावत आहे. भोंग्यांच्या साह्याने काही प्रमाणात महिला व मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडला जात असून
तसेच अनेकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे पोलीस प्रशासनाने भोंगे वाजवणाऱ्या विरोधात कडक पावले उचलावीत अशी मागणी यात्रेकरू प्रामुख्याने महिलांमधून जोर धरू लागली आहे. यावर पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका
घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सांगोल्याचे ग्रामदैवत श्री. अंबिका देवी यात्रेस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सुरुवात झाली असून या यात्रेत खेळणे - पाळणे खाद्यपदार्थाची विविध दुकाने, स्टॉल यासह छोटे-मोठे उद्योग व्यवसाय उभारले आहेत.
मागील दोन ते तीन दिवसापासून यात्रेत चांगलेच रंग भरले असताना रथसप्तमीच्या मुहूर्ता पासून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली आहे.
यात्रेसाठी मुली व महिलांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. यात्रा फिरण्यासाठी आलेल्या मुली व महिलांना या भोंग्यांचा मोठ्या प्रमाणात नाहकत्रास सहन करावा लागत आहे. कर्कश आवाजात पाठीमागून येऊन भोंगे वाजवले जात असल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
परिणामी भोंग्यांमुळे यात्रेतील आनंदावर आणि उत्सवावर विरजण पडत असून शनिवारी भोंग्यांच्या कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाल्याच्याही चर्चा आहेत. यावर पोलिसांनी कडक पावले उचलावीत अशी मागणी सर्वसामान्य नागरिक महिला वर्गातून होत आहे.


0 Comments