मोठी बातमी! सोलापुरात आयकर विभागाच्या धाडी सोलापूर शहरात आयकर विभागाने धाडी
टाकल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे सोमवार ते गुरुवार सकाळी ही मोहीम राबविण्यात आली. सोलापुरातील विविध व्यावसायिकांच्या घरावर व कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली. अत्यंत गुप्तता पाळत आयकर विभागाने ही मोहीम पार पडली.
विशेष म्हणजे बांधकाम साहित्य, स्टील विक्रेते, भंगार विक्रेते आणि बीफ कंपनी यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. शहरातील भंगार विक्रेत्यांनी 50 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे हे विक्रेते आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.
सोलापुरातील आसरा, कुमठा नाका आणि हैदराबाद रोड येथे धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये आयकर विभागाने चौकशी सुद्धा केली आहे. मुळेगाव रोड येथील एका कत्तलखान्यावर सुद्धा छापा टाकण्यात आला. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे विविध व्यावसायिक धास्तावले आहेत


0 Comments