google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील घटना...लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार मुलीनं लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News

सांगोला तालुक्यातील घटना...लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार मुलीनं लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

 सांगोला तालुक्यातील घटना...लग्नाचे आमिष दाखवून दोन वेळा पळवून नेऊन तिच्यावर वारंवार

अत्याचार मुलीनं लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

मुलीने संपवले जीवन

 अल्पवयीन मुलीस फूस लावून लग्राचे आमिष दाखूवन पळवून घेवून जावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यामुळे अल्पवयीन मुलीने मानसिक तणावामध्ये येवून घरातील लोखंडी अँगलला पांढऱ्या रंगाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर घरातील कुटुंबीयांना तुम्ही केलेली केस परत घ्या, आणखी एक केस झाली तरी आम्हाला काय फरक पडणार नाही, 

तुमचीच सगळ्या गावात अब्रु गेली, तुझ्या मुलीला गावात तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही, तुम्हाला गावात रहायचे आहे, तुझे गावात एकच घर आहे, अशी वारंवार धमकी दिल्याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी उशिरासांगोला पोलिसात एकावर गुन्हा दाखल केला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की. गावातील सरपंच व माजी सरपंच सदस्य यांना तसेच कुटुंबीयातील नातेवाईकांनी संतोष भुसनर यास माझी मुलगी अल्पवयीन असून तु दोन वेळा पळवून नेली आहे. 

गावात आमची काय अब्रु राहिली, आमच्या मुलीसोबत कोण लग्न करणार याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्याने गावात वरील सर्वासमक्ष यापुढे मेघा हिच्या वाटयाला जाणार नाही, असे सांगितले होते. 

त्यामुळे अल्पवयीन मुलीस संतोष भुसनर याने पळवून नेवून सुध्दा मुलीचे पुढे व्हायचे जायचे असल्याने व कुटुंबातीलइतर मुलांच्या भविष्याचा विचार करुन इज्जतीच्या भितीने पोलीस स्टेशनला दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी दिलेली तक्रार गैरसमजूतीने दिल्याचे सांगितले होते. परंतु अल्पवयीन असताना लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला

 असल्याने पीडित खूप मानसिक तणावाखाली होती. ती वारंवार भुसनर याच्यामुळे माझे वाटोळे झाले आहे. माझी सगळ्या गावात अब्रू गेली आहे. मला गावात तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही. मी जगून तर काय करू असे बोलत होती.

 कुटुंबातील सदस्य व नातेवाइक तिची वारंवार समजूत काढत होतो. त्यानंतर सुध्दा भुसनर हा कुटुंबीयातील सदस्यांना तसेच मुलीला घरी येवून वगावात भेटून, तुम्ही केलेली केस परत घ्या, केस झाली तरी मला काय फरक पडला, मी सुटून बाहेर आलोच आहे, 

तुमचीच सगळ्या गावात अबुर गेली, तुझ्या मुलीला गावात तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही, तुझ्या मुलीसोबत आता कोण ला करणार, तुम्हाला गावात रहायचे आहे का नाही? तुझं गावात एकच घर आहे. अशी धमकी देत होता. यावर मानसिक तणावाखाली येऊन अल्पवयीन मुलीने पांढऱ्या रंगाच्या ओढणीने लोखंडी अँगलला गळफास घेतला. 

याबाबत कुटुंबातील सदस्यांना नातेवाईकांना कळवून सदरची घटना पोलिसांना कळविले असतास पोलिसांनी पाहणी केली. दरम्यानउपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील डक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

 यावर संतोष भुसनर याने तिला दिलेल्या मानसिक त्रासामुळे तसेच दोनवेळी तिला पळवून नेवून तिला लग्राचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याने ती मानसिक तणावामध्ये संतोष भुसनर यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली. 

तरी ही संतोष भूसनर हा कुटुंबातील सदस्यांना वारंवार केलेली केस परत घ्या असे धमकावत आहे. त्यामुळे मयत मुलीच्या वडिलांनी उशीराने सांगोला पोलिसात तक्रार दाखल केली आहे.यापुढील घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे.

Post a Comment

0 Comments