google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय आयोजित शिवराय व शंभूराजे यांच्या कर्तृत्ववान जीवनचरित्रावर आधारीत शिवशंभु ऐतिहासिक राष्ट्रीय परीक्षेचा निकाल जाहीर....

Breaking News

श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय आयोजित शिवराय व शंभूराजे यांच्या कर्तृत्ववान जीवनचरित्रावर आधारीत शिवशंभु ऐतिहासिक राष्ट्रीय परीक्षेचा निकाल जाहीर....

 श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय आयोजित शिवराय व शंभूराजे यांच्या कर्तृत्ववान

जीवनचरित्रावर आधारीत शिवशंभु ऐतिहासिक राष्ट्रीय परीक्षेचा निकाल जाहीर....

शिरभावी :-  महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर छत्रपती श्री शिवराय व धर्मवीर शंभूराजे यांच्या जीवनचरित्रावर शिवशंभु ऐतिहासिक परीक्षा सम्पन्न झाली.. दि.13 नोव्हेंबर 2022 रोजी झालेली ऑनलाइन/ऑफलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.. शिवराय,शंभूराजे व गडकिल्ले यांचा इतिहास घरा घरा पर्यंत पोहचावा या हेतूने श्री रायगड विश्वविद्यालय द्वारे या परीक्षेचे आयोजन केले जाते..

आपल्या शैक्षणिक जीवनात अभ्यासक्रमात शिवरायांच्या शंभुराजेंच्या कर्तृत्वान चरित्राचा समावेश अतिशय कमी प्रमाणात करण्यात आलेला आहे.. शिवशंभु आणि गडकिल्ले यांच्या इतिहासावर विद्यापीठ कार्य करत आहे..

 श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय मध्ये कार्यन्तरीत असलेले सर्व शिक्षकवर्ग, पर्यवेक्षक ,केंद्रप्रमुख, परिक्षाप्रमुख, जिल्हाप्रमुख,परीक्षा केंद्र म्ह्णून स्थानिक शाळा व महाविद्यालय मधील प्राध्यापक, शिक्षकवर्ग, सर्वांनी सहकार्य केले व परीक्षा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले.

या वेळी सर्व विद्यार्थी सांस्कृतिक पोशाखात परीक्षा केंद्रावर उपस्थित होते, ऐतिहासिक शिक्षणासोबत संस्कृती ही टिकावी हा मुख्य हेतू विद्यापीठ चे असून याचे सर्व विद्यार्थी व पालक तंतोतंत पालन करतात.


कोणत्याही विद्यार्थ्यांना ही ऐतिहासिक परीक्षा देताना वयाची व शिक्षणाची अट नाही, सोप्या पद्धतीने श्री शिवरायांचा व शंभुराजेंचा अभ्यासक्रम शिकवला जातो,मुख्य परीक्षेच्या आधी सराव परीक्षा देखील घेतल्या जातात..

2022-23 या शैक्षणिक प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.


यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातून  इतिहास श्री 2022 हा खिताब कु.पूजा लक्ष्मण गाडे 94 गुण पुणे,

साक्षी गजानन उबाळे 93 गुण अकोला,

यश दादासाहेब कुंजीर 92 गुण नगर,

स्नेहल विकास देशमुख 90 गुण सिंदखेड बुलढाणा,

रेश्मा राहुल पाटील 90 गुण बीड,

सुरज रवींद्र लांडे 89 गुण,  सह राज्यातून प्रथम व द्वितीय वर्षात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकावर आहेत..

तर जिल्हानिहाय प्रथम आलेले..

प्रथम व द्वितीय वर्षातून..

पुणे-अनुजा अरुण पानसरे,रेश्मा संजय भोसले, नाशिक-स्वयं सुभाष भामरे, नितेश सुरेश शर्मा, रायगड-श्रेया राहुल शिंदे, सौ. ज्योती सुरेश मोकल, सिंधुदुर्ग-मयुरी अमेय भोसले,

 मुंबई/ठाणे- नितीन महादेव धनवडे, स्वप्नील जयवंत धनवडे, नांदेड-चंद्रकांत बबनराव देशमुख, मोहिनी विठलराव कुरतडीकर,सोलापूर-अर्थव विजयकुमार लिगाडे, मिताली संतोष गरड, मानसी मंगेश जाधव, कोल्हापूर-रुद्र दिपक चव्हाण, भारती आदिनाथ खोत, लातूर-सुप्रिया दामोदर डबके, पूजा श्रीनाथ रोकडे, 

नगर-रामहरी गहिनीनाथ मुंगळे, ज्योती गणेश सकुंडे,सांगली- प्रतीक्षा दिपक आंबी, मांतेश भूपाल घुंगरी,हिंगोली- श्रेया गजानन पतंगे, अमरावती-मनीषा योगेश्वर शेंडे, बीड-दिपक कचरू बुरुंडे, धाराशिव-चंद्रकांत पांडुरंग गोफने, चंद्रपूर-वैष्णवी शंकर माटे, 

सातारा-वेदांत रवींद्र भोसले,सुवर्णा रवींद्र भोसले,नागपूर-जयश्री धिरेंद्र मोहिते, रत्नागिरी-श्रेया विलास खुळे, सौनसर मध्यप्रदेश-अनुष्का भुटे, बुलढाणा-वैभव रामराव देशमुख, मनीषा एकनाथ शेळके, अकोला-प्रतीक दीपक हंगेकर, जालना-रोकडे सीता शितलनाथ, गडचिरोली-रिटा घोलप मंगम, गोंदिया-वैष्णवी योगेश बोरकर,

 संभाजीनगर-शुभांगी शामकांत नेरपगार, वर्धा-आरती किशोर मिरझापुरे, जळगाव-अलाई प्रतीक संजय.. ह्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून 

विद्यापीठाचे संस्थापक/अध्यक्ष श्री रायगडपुत्र आकाश भोंडवे पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या.. 2023 वर्षाचे शैक्षणिक वर्ष दि.25 जानेवारी पासून प्रारंभ होत असून जून च्या पहिल्या आठवड्यात मुख्य परीक्षा असेल.

Post a Comment

0 Comments