महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या
मुलगी पळून गेल्याने समाजात बदनामी होण्याच्या भीतीने एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक पुण्याच्या दौंड येथ घटना घडली. दौड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात तीन लहान मुलांसह एकूण सात जणांचे मृतदेह सापडले होते.
सुरुवातीला पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला. मात्र, पोलीस चौकशीत मृत व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मोहन पवार (वय, ५०) संगीता मोहन पवार (वय, ४५) त्यांची मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष)
जावई शामराव फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, त्यांची आत्महत्या नसून चार चुलत भावांनी मिळून हे हत्याकांड घडून आणल्याची धक्कादायक माहिती आली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे नगर मार्गावर ६ महिन्यांपूर्वी मृत मोहन पवार यांचा अमोल नावाच्या पुतण्याचा अपघात झाला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून मोहन आणि त्याच्या कुटुंबीयांनी काळी जादू करून त्यांचा खून केल्याचा संशय मोहन याच्या चुलत भावांना आल्याने त्यांनी सात जणांना ठार मारले.



0 Comments