google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 200 तोळ सोनं, 3 किलो चांदीची चोरी ...

Breaking News

200 तोळ सोनं, 3 किलो चांदीची चोरी ...

 200 तोळ सोनं, 3 किलो चांदीची चोरी ...

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरात काही दिवसांपूर्वी एका घरातून तब्बल 2 किलो सोन्याची चोरी झाल्याची घटना घडली होती.

पण, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या महिला चोराला जेरबंद केलं आहे. या महिलांच्या चोरीची पद्धत पाहून अवाक् झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सिंध सोसायटीत

 डिसेंबर महिन्यात एका बंगल्यातील कुटुंबाशी ओळख निर्माण करुन तब्बल २०० तोळे सोनं आणि ३ किलो चांदी दोन महिलांनी लांबवलं होतं. या महिलांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने बीड- जालनाच्या जवळ असलेल्या गावातून अटक केली आहे.

या महिला चोरट्यांकडून पोलिसांनी 80 तोळे सोनं, दीड किलो चांदी आणि इतर वस्तू मिळून 43 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे सोने ठाण्यातील ज्या सोनाराकडे चोरट्यांनी विकले होते त्या दोन सराफांना ही पोलिसांनी अटक केली आहे. 

या चोरी केलेल्या महिलांना पकडण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्याची वेशभुषा घेऊन बीड जिल्ह्यात तब्बल तीन दिवस तळ ठोकून चोरट्यांचा मागोवा घेत होते. अखेरीस तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी या महिलांना अटक केली.

11 डिसेंबरला सिंध सोसायटीत समीर रामेश्वर दयाल यांच्या घरी घरफोडी करण्यात आली होती. या प्रकरणी खुशबू दिलीप गुप्ता, अनू पवन आव्हाड यांच्यासह सोनार महावीर चपलोत आणि मदन रामेश्वर वैष्णव यांना अटक केली आहे. 

तर या गुन्ह्यातील पूजा दिलीप गुप्ता आणि रितू भोसले या दोन महिला आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपी हे आधी भिकाऱ्याचा वेश घेऊन घराची चाचपणी करत असे आणि नंतर काही कारणाने ओळख वाढवून घरात घुसून चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments