अंगणवाडी विभागामार्फत 20 हजार पदांसाठी मेगा भरती, 10 वी पास महिलांना सरकारी नोकरीची संधी
सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, राज्यात 20 हजार रिक्त पदांसाठी लवकरच अंगणवाडी विभागामार्फत भरती सुरू करण्यात येणार आहे.
अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे. तरी आज आपण या लेखात एकनाथ शिंदे साहेब अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती विषयी नेमकं काय म्हणाले ? या विषयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यादेखील उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन लाख सोलर पंप होणार वाटप
राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 20 हजार जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागांसाठी अंगणवाडी विभागामार्फत लवकरच भरती सुरू करण्यात येईल,
अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिली. त्याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ, नवीन मोबाईल, विमा व अंगणवाड्यांसाठी वर्ग इत्यादी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले.
अंगणवाडी विभागामार्फत होणाऱ्या या भरतीमुळे राज्यातील अनेक महिलांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. ही भरती 10 वी पास वर होणार आहे.


0 Comments