google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 16 वर्षाच्या मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापानं उचललं टोकाचं पाऊल

Breaking News

16 वर्षाच्या मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापानं उचललं टोकाचं पाऊल

 16 वर्षाच्या मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापानं उचललं टोकाचं पाऊल

पुणे शहर आणि उपनगरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.पिंपरी चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. 

आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकून देत वडीलांनीही उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील पलाश सोसायटीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. बापाने आपल्या 16 वर्षाच्या मुलाला इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली फेकले. यानंतर स्वत: उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेमुळे पलाश सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत तपास सुरु केला आहे. 

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.बाप-लेक दोघेही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments