google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- देशातील महापुरुषांचा अवमान व महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ सकल बहुजन समाजाचा मोर्चा व रास्ता रोको

Breaking News

सांगोला- देशातील महापुरुषांचा अवमान व महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ सकल बहुजन समाजाचा मोर्चा व रास्ता रोको

सांगोला- देशातील महापुरुषांचा अवमान व महिलांबाबत बेताल वक्तव्य

करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ सकल बहुजन समाजाचा मोर्चा व रास्ता रोको पहा व्हिडिओ...

सांगोला / प्रतिनिधी:अखंड भारत देशाचे दैवत छ शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबरोबरच महिलांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रमुख पदावर असणाऱ्या 


राज्यकर्त्यांच्या विरोधात सांगोल्यात सकल बहुजन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, पो. नी. अनंत कुलकर्णी यांना निवेदन देवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राज्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

 सध्या राजाच्या प्रमुख पदावर विराजमान असणारे राज्यपाल व सरकार मध्ये महत्वाच्या पदावर असलेल्या जबाबदार राज्यकर्त्यांकडून देशाची अस्मिता असणाऱ्या, तमाम जनतेचे दैवतअसणाऱ्या महपुरूषांच्या बाबत अपशब्द

 वापरणे, त्यांच्या नावाचा वापर करून सामाजिक भावना दुखवण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जात आहे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे समजा समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या अश्या वाक्तंव्यामुळे देशातील तमाम जनतेच्याभावना दुखावल्या जात असून सामाजिक एकोप्याला धोका निर्माण झाला आहे. 

तसेच महिलांच्या बाबत अपशब्द वापरून त्यांचा अनादर केला जात आहे. हे सर्व वेळीच थांबले पाहिजे नाहीतर देशाची शांतता भंग पावून जातीय दंगली घडतील असा इशारा देत बहुजन समाजाच्या वतीने पंढरपूर- मिरज रोडवर रस्तारोको करण्यात आले.

 यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे डॉ बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे तानाजी काका पाटील, डॉ पियूष साळुंखे - पाटील, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अनिलनाना खटकाळे, 

काँग्रसचे रवी कांबळे, मनसेचे विनोद बाबर, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे बाबासाहेब बनसोडे , पंचायत समिती माजी सदस्य सुभाष इंगोले, बहुजन चळवळीचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. यावेळी बापूसाहेब भाकरे, 

कडलासचे सुनील पाटील, युवा नेते योगेशदादा खटकाळे, अमर लोखंडे, राजू मगर, चंदन होनराव, राजेंद्र यादव, दीपक खटकाळे, सनी पाटील, विजय केदार, वैभव केदार, संजय बाबर, राजू पाटील, अशोक शिनगारे, किशोर म्हमाणे अदी सकल बहुजन समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments