पोलिसांविरुद्ध आता तक्रार नोदिवण्यात येणार ... सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
, जानेवारीत प्राधिकरणाची स्थापना होणार...
पोलिसांविरुद्ध सामान्य नागरिक किंवा आरोपी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास घाबरतात. आता मात्र त्यांच्या विरोधात बिनधास्तपणे तक्रार नोंदविता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांविरोधात तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये याप्राधिकरणाची स्थापना करून महाराष्ट्र राज्य अशा प्रकारच्या प्राधिकरणाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य ठरले.
पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या गैरवापराबाबत येथे तक्रार करता येते. कुपरेज परिसरातील एमटीएनएल कार्यालयाच्या चौथ्या म जल्यावर प्राधिकरणाचे कार्यालय आहे.
याशिवाय दूरस्वनी क्रमांक आहेत. mahaspca@gmail. com या ई-मेलवर तक्रार करू शकतो. प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. व्ही. पोदार (निवृत्त न्यायाधीश), याशिवाय अतिरिक्तमहासंचालक (निवृत्त) आर. आर. सोनकुसरे, प्रेम किशन जैन आणि निवृत्त सनदी अधिकारीरामाराव हे प्राधिकरणाचे सदस्य आहेत.
अतिरिक्त महासंचालक (आस्थापना) याप्राधिकारणाचा सदस्य सचिव असतो. प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे ते साक्षीदाराला समन्स पाठवू शकतात, त्यांची तपासणी करू शकतात प्रतिज्ञापत्रावर साथ घेऊ शकतात,
त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाईची शिफारस करण्यात येते. प्रकार फार गंभीर असल्यास त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचीशिफारसही पॉईंट, मुंबई हे प्राधिकरण करू शकते. त्यांच्या शिफारशीवर कारवाई न झाल्यास संबंधितविभागाला लेखी
स्वरूपात उत्तर प्राधिकरणाला यावे लागते.
पोलिस कर्मचारी तथा अधिकारी यांचे विरुद्ध करण्यात येणाऱ्या तक्रारीसंदर्भात कर्तव्य बजावण्यात कसूर वगैरे केल्याबद्दल विभागीय चौकशीद्वारे पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या व्यक्तीना शिक्षा करणे मुंबई पोलीस अधिनियम कलम २५ अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणे, राज्य मानव अधिकार आयोग यांचेकडे तक्रार दाखल करणे, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांचेकडे तक्रार दाखल करणे, इंडियन पिनल कोड कलम १६६ ते १७१ अन्वये तक्रार दाखल करणे,
मा. •न्यायालयात तक्रार दाखल करणे, आपणास जर पोलिसांविरुद्ध तक्रार द्यायची असेल तर प्राधिकारणाचा पत्ता अध्यक्ष, राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण था मजला, कुपरेज टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, महर्षि कर्वे रोड, नरिमन ४०० mahaspca@gmail. email_ com०२२-२२८२००४५ संपर्क साधावा.
0 Comments