google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी मृत्यू...विठ्ठल कारखाना अपघात, दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू !

Breaking News

दुर्दैवी मृत्यू...विठ्ठल कारखाना अपघात, दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू !

 दुर्दैवी मृत्यू...विठ्ठल कारखाना अपघात, दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू !

 विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अपघातात दुसऱ्याची कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकूण दोन कामगारांना प्राणाला मुकावे लाले आहे त्यामुळे कामगारात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.  

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या  बॉयलिंग हाऊसमध्ये काम करीत असताना कामगाराचा प्राण जाण्याची घटना काल घडली होती. 

या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता आणि दुसरा कामगार गंभीर जखमी झाला होता. या कामगारास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु जखमी कामगाराचाही उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची बातमी आली आणि कामगार प्रचंड हळहळले आहेत. 

 पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथील कामगार सुधाकर सदाशिव चौगुले आणि जळोली येथील सोमनाथ मारुती नरसाळे हे दोन कामगार येथे काम करीत असताना स्टीम वॉल निकामी झाला आणि त्याचा दणका या कामगारांना बसला. 

उंचीवर काम करणारे कामगार उंचावरून खाली कोसळले आणि यात सुधाकर चौगुले या कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर सोमनाथ नरसाळे हे कामगार गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना जळोली येथील सोमनाथ नरसाळे हे देखील मृत्युमुखी पडले आहेत.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन वर गेली असून कामगारांची सुरक्षा हा विषय देखील आता ऐरणीवर आलेला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने साखर कामगारात खळबळ उडाली असून चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे. 

साखर कारखान्यात काम करीत असताना ही घटना घडली असून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.  या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे ?  स्टीम वॉल निकामी कशामुळे झाला ? साखर कारखान्यात कामगार एवढे असुरक्षित कसे ? असे अनेक प्रश्न या अपघाताने निर्माण केले आहेत.

Post a Comment

0 Comments