आईने केली 15 वर्षीय मुलाची हत्या, मृतदेह पुरला घरात
राज्यातील औरंगाबाद मधील शिवगंज येथे मनाला थरकाप उडविणारी घटना घडली आहे, आईने आपल्या 15 वर्षाच्या मुलाची हत्या करीत त्याचा मृतदेह घरात खड्डा करीत पुरला.
मागील काही दिवसांपासून शिवगंज परिसरात राहणाऱ्या कांचन देवी यांच्या घरातून शेजाऱ्यांना दुर्गंधी येत होती, आधी सर्वांनी दुर्लक्ष केले मात्र त्यानंतर दुर्गंधी वाढत गेल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी त्या बंद घरात जात तपास केला असता त्याठिकाणी एका खड्ड्यातून अति दुर्गंध पोलिसांना आला.
पोलिसांनी एफएसएल च्या चमुला पाचारण करीत त्या खड्ड्यातून माती बाहेर काढली असता पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. त्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळला.
पोलिसांनी कांचन देवी ला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता तिनेच आपल्या 15 वर्षीय मुलाची हत्या केली असल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे 3 महिन्यांपूर्वी कांचन देवी च्या 17 वर्षीय मुलीचा असाच संशयास्पद मृत्यू झाला होता, मुलीची हत्या कांचन देवी ने केली असेल याबाबत पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती औरंगाबादच्या पोलीस उपविभागीय अधिकारी स्विटी सेहरावत यांनी दिली.
0 Comments