चारचौघात पैसे परत का मागितले म्हणून युवकाची हत्या
औरंगाबाद - राज्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून ही गुन्हेगारी क्षुल्लक कारणावरून होत आहे.
अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडली.
एकाने मित्राला ऐनवेळी पैश्याची मदत केली होती, मात्र ते पैसे परत घेण्यासाठी त्याला वारंवार मित्राला फोन करावा लागत होता, अनेक वेळी पैश्याचा तगादा मित्राने लावला तरी पैसे काही परत मिळाले नाही. एकदिवस 21 वर्षीय सागर संतोष जैस्वाल ने मित्राला उसने दिलेले पैसे चार चौघात मागितले, मात्र चार चौघात पैसे का मागितले याचा राग मित्राला आला.
त्याने कशाचाही विचार न करता सागर चा खून केला, खुनाची बाब कुणाला कळू नये यासाठी सागर चा मृतदेह पेडकवाडी घाटातील पाईप मध्ये लपविण्यात आला.सागर घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियाने बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली, पोलिसांनी सागर बेपत्ता असल्याचा तपास केला असता त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला.
त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत सखोल तपास केल्यावर 3 आरोपींना अटक करण्यात आली, चारचौघात उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून सागरची हत्या केली असा कबुलीजबाब आरोपीनी दिला.
0 Comments