Breaking News

देशात स्वतंत्र दिन प्रजासत्ताक दिन जेवढे महत्वाचे तेवढाच संविधान दिन अति महत्वाचा : सुरज दादा बनसोडे

 देशात स्वतंत्र दिन प्रजासत्ताक दिन जेवढे महत्वाचे तेवढाच संविधान दिन अति महत्वाचा : सुरज दादा बनसोडे 

 हर घर तिरंगा तसेच हर घर संविधान अभियान काळाची गरज 

सांगोला/वृत्तवेध : देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा होत असताना 26 नोव्हेंबर हा दिन त्याच तोला मोलाने साजरा होणे काळाची गरज आहे.

 वास्तविक पाहता देशाला स्वतंत्र मिळाले 15 ऑगष्ट 1947 रोजी आणि देशाचे संविधान महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अतोनात कष्ट घेऊन लिहले व 1949 ला देशाला समर्पित केले. आणि ते संविधान

 ( राज्यघटना, कायदा ) 26 जानेवारी 1950 रोजी आमलात येऊन त्या दिवसापासून प्रजासत्ता म्हणजे लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही अंमलात आली. म्हणून स्वतंत्र दिन झाला मग संविधान लिहल्या नंतरच खरी प्रजा, सत्ता आणि स्वतंत्र मिळाले. म्हणून संविधान दिन स्वतंत्रदिन व प्रजासत्ताक दिना एवढाच महत्वाचा आहे. 

त्या दिनाचे व संविधानाचे महत्व लोकांना समजावे संविधान म्हणजे नेमकं काय ते कोणी लिहले त्याचे देशासाठी किती महत्वाचे योगदान आहे. कारण संविधान ( राज्य घटना, कायदा )सर्वच जाती धर्माच्या व्यक्ती बरोबरच अनेक घटनेसाठी किती महत्वाचा आहे. 

हे देशातील प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींना समजला पाहिजे. संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे सर्वधर्म समभाव आहे समता, स्वतंत्र, बंधुत्व जोपासणारी लोकशाही सांगणारा जणू देशाचा खरा ग्रंथच आहे.

 आणि संविधान वाचेल तर देश वाचेल आणि लोकशाही जिवंत राहील. म्हणून देशातील सर्वच धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, ह्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करावे. 

कारण प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार निर्भीड व मुक्तपणे करण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेने आपल्या हायस्कुल, विद्यालये व महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून सांगणे काळाची गरज आहे. 

शिवाय शासकीय कार्यालये या ठिकाणी सुद्धा म्हणजे महसूल खाते, पोलीस प्रशासन, नगरपालिका अशी विविध कार्यालये आहेत. त्या ठिकाणी फक्त संविधानाची उद्देशिका वाचन न करता आपल्या स्टाफला संविधाना विषय माहिती द्यावी.

 तहसीलदार यांनी सर्वच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय यांना तशा सूचना द्याव्यात. की ज्या गावात ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा केला नाही तर त्या गावच्या ग्रामसेवक, तलाठी व सरपंच व त्यांची बॉडी यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होईल.

 शिवाय तहसीलदार यांनी शहरातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन व नगरपालिका सर्वच कर्मचारी यांचा एकत्रित कार्यक्रम घेऊन संविधान दिन उद्देशिका वाचनाबरोबर संविधान ( राज्य घटना, कायदा )

 ह्याची माहिती सांगावी असे निवेदनाद्वारे आरपीआय तालुका अध्यक्ष व मा. नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी मागणी केली आहे. शिवाय ग्रामीण भागातील प्रत्येक गावात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांनी आपल्या गावात चौकामध्ये संविधान दिनाचे डिजिटल बोर्ड लावावे जेणे करून सर्वच जाती धर्मातील तळागाळातील व्यक्ती असेल किंवा कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर अशिक्षित व्यक्ती यांना सुद्धा संविधान दिन म्हणजे काय व त्याचे महत्व काय हे समजेल.

 म्हणून भिमअनुयायी व जयंती उत्सव मंडळे यांनी गावच्या चौकात संविधान दिनाचे डिजिटल बोर्ड लावण्याची विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाचे तालुका अध्यक्ष व मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments