DPC सदस्य नसताना अतुल पवार बोलले, पालकमंत्री अवाक् ; कोण तुम्ही, बोलायचा अधिकार नाही तुम्हाला ; असे काय घडले
सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्यात आली. सभेमध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठ्याच्या जलजीवन मिशन योजनेच्या टेंडर संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी त्यांचीच बाजू घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते ते बोलतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती बरखास्त केली असतानाही सांगोल्याच्या अतुल पवार यांनी मध्येच उठून "दादा सगळ्या निविदा स्पर्धेतून होऊ द्या, मॅनेज करून देण्याची काय गरज" असा मुद्दा उपस्थित केला.
त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडे पाहिले, कोण तुम्ही? तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोण दिला? मी अतुल पवार जिल्हा परिषद सदस्य असे म्हणताच
मला विचारल्याशिवाय कसे काय बोललात जिल्हा नियोजन समिती बरखास्त झाली आहे या शब्दात त्यांनी पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावेळी पवार यांना गपगुमान बसावे लागले. नक्की काय घडले सभागृहात पहा हा व्हिडीओ...
0 Comments