google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 250 रुपयांच्या वर असलेल्या या वस्तू मिळणार केवळ 100 रुपयांना

Breaking News

250 रुपयांच्या वर असलेल्या या वस्तू मिळणार केवळ 100 रुपयांना

 250 रुपयांच्या वर असलेल्या या वस्तू मिळणार केवळ 100 रुपयांना

देशात सतत वाढत असलेल्या महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे, महागाईने सामान्यांचे बजट कोलमडून गेले आहे, मात्र अश्यात महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

राज्यातील शिधापत्रिकाधारकांना २७० रुपयांचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी १ किलो व १ लिटर पामतेल मिळेल. जिल्ह्यातील ५ लाख ३७ हजार कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एका महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ८५ हजार ४५४, तर शहरातील ३ लाख ३० हजार ९१७ अशा एकूण ९ लाख १६ हजार ३७१ कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.

राज्य सरकारकडून टेंडर काढण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या चारही वस्तूंचे स्वतंत्र पॅकेट तयार करून घेतले जाणार आहे. नंतर हा एकत्रित माल जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण विभागाच्या गोडाऊनमध्ये आणण्यात येईल. हे पॅकेटनंतर रेशन दुकानदारांमार्फत रेशनकार्डधारकांना देण्यात येणार आहेत.

बाजारभावानुसार सध्या साखर ३८, चणाडाळ ८४, रवा ४५, पामतेल १०० रुपयांना मिळते. याचाच अर्थ २६७ ते २७० रुपयांचे हे पॅकेट राज्य सरकारकडून केवळ १०० रुपयांत मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments