"ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण"; शहाजीबापू पाटील यांची खोचक टीका
एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दादरमधील शिवाजीपार्कवर आहे. शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट दसरा मेळाव्याची तयारी करत आहे.
दोन्ही गटाकडून शक्तीप्रर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडल्यासारखे आरोप, टोलेबाजी करत आहेत. तर बाकीचे नेतेही या दसरा मेळाव्यावरून भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण दिल्याचा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. उद्या दसरा मेळाव्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी वरील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यावेळी शिंदे गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. आमचीच शिवसेना खरी असल्याचं दाखवण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे.
त्यामुळे शिंदे या मेळाव्यात काय बोलतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्या या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 30 ते 35 हजार शिवसैनिक जाणार असल्याची माहिती शहाजीबापू यांनी दिली. दरम्यान रोहित पवार यांनी ठाकरे यांच्या मेळाव्याला शिंदे गटाच्या मेळाव्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी असणार असल्याचे म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देत शहाजीबापू यांनी या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असणार असल्याची खोचक टीका पवारांवर केली आहे.
शिंदे गटाचा मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल असा दावा देखील शहाजी बापू यांनी यावेळी बोलताना केला. शहाजी बापू यांच्या या वक्तव्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काय उत्तर येणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. :
0 Comments