धक्कादायक!घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा रस्त्यावर आपटून केला खून
घरगुती भांडणातून पतीने त्याच्या पत्नीचे डोके रस्त्यावर आपटून तिचा खून केला व यानंतर पतीने पळ काढला. डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवढाणी पारस पाडा येथे ही घटना घडली.
संगीता साहनी (वय 42 वर्षे) असे मृत महिलेेचे नाव असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती शिवकुमार सहानी (वय 35 वर्षे) याला शिताफीने अटक केली.
घरगुती भांडणातून पतीने त्याच्या पत्नीचे डोके रस्त्यावर आपटून तिचा खून केला व यानंतर पतीने पळ काढला. डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवढाणी पारस पाडा येथे ही घटना घडली. संगीता साहनी (वय 42 वर्षे) असे मृत महिलेेचे नाव असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती शिवकुमार सहानी (वय 35 वर्षे) याला शिताफीने अटक केली.
संगीता साहनी (वय 42 वर्षे) हिचा पहिला पती प्रकाश करबट हा मयत झाला होता. ती शिवकुमार रामशीव सहानी (वय 35 वर्षे) या दुसऱ्या पती बरोबर राहत होती. तिला पहिल्या पती पासून सागर व विकास ही दोन मुले होती. गेल्या 12 वर्षांपासून शिवकुमार यासह संगीता बरोबर राहत होता.
तो गवंडी बिगारी म्हणून काम करीत होता. त्यांच्यात नेहमीच भांडणे होत व्हायची. त्यामुळे शिवकुमार संगिताला मारहाण करायचा. दरम्यान 2 तारखेला रात्रीच्या दरम्यान घरात कडाक्याचे भांडण झाले असता शिवकुमारने बॅटरीच्या साहाय्याने तिच्या डोक्यात मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिचे डोके डांबरी रोडवर आपटून मारले आणि स्वतः पळून गेला.
याबाबतची माहिती कासा पोलीस ठाण्याला भेटली असता कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी श्रीकांत शिंदे व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी घटनेची पाहणी करत तपास सुरू केला.
पोलिसांनी फरार शिवकुमारच्या मित्र मंडळीशी संपर्क करून त्यानुसार लोकेशन पकडून विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील एका घरात लपून बसलेल्या शिवकुमारच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान शिवकुमार मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याने तसेच त्याचे सर्व ओळखपत्र याच भागातील असल्याने त्याला पकडने खूप कठीण होते; पण कासा पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने त्याला पकडून अटक केली. अधिक तपास कासा पोलीस करीत आहे.
0 Comments