google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची एस.पी.सी.एल सर्व्हिसेस इन्फोटेक प्रा.लि कंपनी मध्ये निवड

Breaking News

विज्ञान महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची एस.पी.सी.एल सर्व्हिसेस इन्फोटेक प्रा.लि कंपनी मध्ये निवड

 विज्ञान महाविद्यालयातील ११  विद्यार्थ्यांची एस.पी.सी.एल सर्व्हिसेस इन्फोटेक प्रा.लि कंपनी मध्ये निवड

सांगोला/प्रतिनिधी- विज्ञान महाविद्यालय सांगोला व एस.पी.सी.एल इन्फोटेक सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये विज्ञान महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे कु.पिरजादे –मुजावर खलीदाबेगम हारून, 

श्री.भगत योगेश धोंडीराम, श्री.जाधव विशाल तात्यासो, कु.वगरे सोनाली गंगाराम, श्री.लाडे सागर बाळासो, श्री.मोटे अजित रघुनाथ, कु.नवले काजल पांडुरंग, श्री.क्षिरसागर ओंकार, श्री.गायकवाड ज्ञानेश बापू, श्री.इंगोले रोहित किसन, श्री.पाटील ऋषिकेश गुलाबराव. १३ ऑक्टोबर व १४ ऑक्टोबर या दोन दिवसात विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे सदर ड्राईव्ह आयोजित केला होता.

 १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक  मा. चंद्रकांत(दादा) देशमुख, संस्था सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे, संस्था संचालक मा.श्री. अशोकराव शिंदे , संस्था संचालक  मा.श्री. दिपकराव खटकाळे, कंपनीचे प्रमुख मा.श्री. संजय शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले, 

संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख मा.श्री. हणमंत कोळवले, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. शेख एन. एस., कंपनीचे फायनान्स ऑफिसर विरेंद्र नागोरिया, कंपनीचे एच. आर. अक्षदा शिंदे, प्रोजेक्ट मॅनेजर प्रणव वाणी, सिनियर सॉफ्टवेर डेव्हलपर सुमय्या मुल्ला, कंपनीचे असिस्टंट अतुल जाधव  तसेच संगणकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

     १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी १ वाजता ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर ४ ते ६ या वेळेत ग्रुप डिस्कशन घेण्यात आले.  १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता टेक्निकल राऊंड व दुपारी १ वाजता एच.आर. राउंड आणि त्यानंतर दुपारी ३ वाजता 

पर्सनल इंटरव्ह्युव्ह व सायंकाळी ५ वाजता निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.  निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले यांनी  जॉब मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण घेतले पाहिजे. व नियमीत प्रॅक्टिकल केले पाहिजे असे सांगितले. 

त्यानंतर संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी असे सांगितले की जास्तीत जास्त मुलांचे रिक्रुटमेंट करण्यासाठी महाविद्यालय व संस्था मुलांना सर्व प्रकराची मदत करण्यास तयार आहे .  मुलांनी आपल्या करीयर कडे संपूर्ण लक्ष द्यावे असेही सांगितले. त्यानंतर संस्था संचालक मा.डॉ.श्री. अशोकराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि प्रत्येक 3 ते 4 महिन्याला कॉलेज वरती वेगवेगळ्या कंपन्यांचे कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.  विद्यार्थ्यांनी चांगले प्रयत्न करून ड्राईव्ह यशस्वी करावेत असे आवाहन त्यांनी केले.  कंपनीचे प्रमुख संजय शहा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ऑफर लेटर वितरित केले.

  कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. फुले आर.ए. यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कोळवले एच.डी.,  प्रा. सरगर बी.आर, प्रा. भानवसे डी.पी, प्रा. निलेश रसाळ, प्रा.शेख जे.यु, प्रा. लवटे पी.एम, प्रा. कोळवले डी.एस, प्रा. शेख एन.एस, प्रा. शिंदे डी.आर, 

प्रा. देशमुख आर.एन., प्रा. बंडगर एन.एच., प्रा. चव्हाण सी. डी., प्रा.सौ. कसबे एस.व्ही, प्रा.सौ. धुरे एम.डी, प्रा.सौ. मेटकरी एम.एस, प्रा.सौ. पाटील एल.आर., प्रा. सौ. इनामदार आर.ए., प्रा, सौ. माळी पी.आर., प्रा. सौ. कोकरे टी.जे.,  प्रा. कु. गौरी कस्तुरे, श्री. कादरी एम.जे, श्री. सोमनाथ कारंडे, श्री. सुनील तंडे, श्री. अमोल गाडे, श्री. गव्हाणे एस.बी, श्री. निसार मुलाणी, प्रकाश वाघमोडे  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments