google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रेल्वे कर्मचाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ ; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Breaking News

रेल्वे कर्मचाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ ; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 रेल्वे कर्मचाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ ; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : हद्दवाढ भागातील ललिता नगर इथं राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने त्याच्या घरासमोर राहत असलेल्या बौद्ध समाजाच्या तीन कुटुंबाकडे हातवारे करून जातीवाचक व खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ अश्लील हावभाव केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रिक्षाचालक लक्ष्मण बब्रुवान कटारे वय 40 यांनी फिर्याद दिली असून सिद्धाराम निंगप्पा हडपद वय 30 वर्ष याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 3 (1)(r), 3 (1)(s), 3 (2)(vs) भादविक 294, 354, 504, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या घरी टीव्ही पहात बसले होते, काही वेळाने सिद्धाराम हडपद हा दारू पिऊन आला, त्याने थेट फिर्यादीच्या दारात येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली,  जातीवाचक उल्लेख करून खालच्या भाषेत शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादीने आपला दरवाजा बंद केला, तेव्हा शेजारी राहत असलेल्या फिर्यादीच्या भाचीच्याकडे घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. 

या सर्व प्रकार शेजारच्या सर्व लोकांनी पाहिला असून फिर्यादीच्या भाचीने जातीवाचक शिवीगाळ केलेला व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिद्धाराम हडपद याला अटक केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड हे करीत आहेत. सिद्धाराम हडपद हा रेल्वे प्रशासनात कर्मचारी असून यापूर्वी दोन वेळा त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आहे.

Post a Comment

0 Comments