16 वर्षीय मुलाच्या अत्याचारातून तरुणी गर्भवती
जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धमकी देत 16 वर्षीय मुलाकडून वारंवार एका 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन 2021 पासून वेळोवेळी पिडीता इतर महिलांसोबत शेत मजुरीसाठी शेतात जात होती. तेव्हा तिची ओळख 16 वर्षीय संशयित आरोपीशी झाली. ते एकमेकांशी बोलु लागले. त्यानंतर संशयित आरोपी याने पिडीतेशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच पिडीतेस धमकी देवून तिच्यावर जबरदस्ती केळीच्या शेतात वारंवार अत्याचार केला.
दरम्यान या अत्याचारातून तरुणी गरोदर झाली. अखेर 1 ऑक्टोंबर रोजी पिडीतेनेपोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास पो. उप निरीक्षक सुदाम काकडे हे करीत आहेत. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
0 Comments