google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; महामंडळाच्या वाहतूक ताफ्यात इलेक्ट्रिक व सीएनजी बसगाड्या धावणार

Breaking News

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; महामंडळाच्या वाहतूक ताफ्यात इलेक्ट्रिक व सीएनजी बसगाड्या धावणार

 मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; महामंडळाच्या वाहतूक ताफ्यात इलेक्ट्रिक व सीएनजी बसगाड्या धावणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासोबतच नवीन ध्येयधोरणांची अगदी चोखंदळपणे आखणी करताना दिसून येत आहे, याअंतर्गत एस. टी महामंडळाबाबत काही महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले.

 मुख्यमंत्र्यांनी येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत एस. टी महामंडळाच्या ताफ्यात १५० इलेक्ट्रिक बसगाड्यांची तर पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत १००० सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच परिवहन आयुक्तालयाची संयुक्त आढावा बैठक पार पाडली, यावेळी काही प्रमुख विषयांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

या बैठकीच्या अनुषंगाने एस. टी कर्मचाऱ्यांच्या संपा दरम्यान बडतर्फ करण्यात आलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सदर बैठकीला विविध विभागाचे सचिव, परिवहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच परिवहन आयुक्त इत्यादींची उपस्थिती होती. 

एस. महामंडळात सामील करण्यात येणाऱ्या १५० इलेक्ट्रिक बसेस या भाडेतत्वावर घेणार असून, ५०० डिझेल बसेस देखील खरेदी करण्यात येणार आहे. जून २०२३ पर्यंत जवळपास दोन हजार इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात सामील करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

एस. टी महामंडळाच्या या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करून आढावा घेण्यात आला. यामध्ये डीबीओएलटी तत्वावर बसपोर्ट विकास करण्याचे धोरण, महामार्गावरील अपघात रोखण्याच्या उपाययोजना, आतापर्यंत झालेली महसूल प्राप्ती, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थींनी घेतलेल्या मोफत बस सेवेचा लाभ व त्यांची आकडेवारी, मालवाहतुकीद्वारे मिळणारे उत्पन्न इत्यादी बाबींवर आढावा बैठकीत मुख्यत्वे करून चर्चा केली गेली.

Post a Comment

0 Comments