आता आंध्रातच नाही तर सोलापुरातही होऊ लागले असे स्वागत ; गरुडझेप काय ते नक्कीच वाचा
सोलापूर : हिंदवी परिवाराने सोलापूर येथे उमा भागवत चित्रमंदीर येथे शिवप्रताप गरूडझेप (आग्र्याची सुटका) या चित्रपटाचे विशेष शो आयोजित केला होते.
ह्यासाठी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवरत्न शेटे यांच्या आवाहनाला हिंदवी परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकुटुंब हा चित्रपट बघण्यासाठी उपस्थित राहिला.
ह्याप्रसंगी जसे पूर्वभागातील तेलगू चित्रपटाच्या सुरुवातीला चाहत्याकडून क्रेन द्वारे हार घालून मोठमोठ्या डिजिटल पोस्टर्स लावून चित्रपटाचे स्वागत केले जाते
अगदी तश्याच पद्धतीने मराठी मातीतील कलाकारांनी बनविलेल्या मराठी मातीचा इतिहास व छत्रपती शिवाजी महाराजांचा घडविलेला धगधगता इतिहास लोकांनी पाहावा त्याच कौतुक व्हावं ह्यसाठी चित्रपट गृहाच्या परिसरात हलगी वाजवून व 20 फुटी चित्रपटाचा बॅनर क्रेन द्वारे फडकवून चित्रपटाचे स्वागत करण्यात आले.
तसेच ह्याप्रसंगी हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांना अधिक उत्साहित करण्यासाठी चित्रपटातील शिवाजी महाराजांचे प्रमुख भूमिकेतील अभिनेते खा. डॉ अमोल कोल्हेनी ऑनलाइन व्हिडीओ कॉल करून सर्वांशी सवांद साधला, त्या व्हिडीओ कॉल ला लोकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन उत्स्फूर्तपणे चित्रपट गृहात प्रवेश केला.
चित्रपटाच्या शेवटी चित्रपट गृहाच्या बाहेर आल्यावर प्रत्येकांनी सहकुटुंब पाहावं असा हा चित्रपट असल्याची भावना उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केली. ह्याप्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे, डॉ. सुप्रज्ञा शेटे कार्याध्यक्ष अमोल मोहिते, अभिजित भडंगे, ॲड. एस.आर.पाटील, ॲड. महेश जगताप, सी.ए. गजानन घिवरे, विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, आदींसह हिंदवी परिवारातील सदस्य, पदाधिकारी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते.
0 Comments