google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिक्षकांनो !सावधान.. तंबाखू पदार्थ आढळल्यास, शाळा व शिक्षकांना दंड; शिक्षण विभागाने काढले पत्र

Breaking News

शिक्षकांनो !सावधान.. तंबाखू पदार्थ आढळल्यास, शाळा व शिक्षकांना दंड; शिक्षण विभागाने काढले पत्र

 शिक्षकांनो !सावधान.. तंबाखू पदार्थ आढळल्यास, शाळा व शिक्षकांना दंड; शिक्षण विभागाने काढले पत्र 

शाळा व शाळेचा १०० यार्डचा परिसर तंबाखूमुक्त झाला पाहिजे. तसा फलक शाळेच्या आवारात किंवा दर्शनी बाजूस लावणे अपेक्षित आहे. मात्र बहुतांश शाळांमध्ये तंबाखूमुक्तचे फलक लावलेले नाहीत.

फलक लावा, जागृती करा, विक्री किंवा धूम्रपान होत असेल त्यांना दंड केला जाईल अशा आशयाचे पत्र माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सुनील शिखरे यांनी काढले आहे. स्वच्छ भारत स्वस्थ भारत या अभियानाचा भाग म्हणून निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच असे करणे कायद्याने गुन्हा आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार करून आपल्या शाळेच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कायद्याने बंदी आहे. या प्रकरणी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शालेय समितीच्या बैठकीत हा विषय घेण्यात यावा.

शाळेच्या आवारात दर्शनी ठिकाणी तंबाखू मुक्त फलक लावण्यात यावा, तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास २०० रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाईल , असे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक शिखरे यांनी दिली.

वृत्त प्रकाशित होताच पत्र

सोलापूर जिल्ह्यात फक्त ६६० शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. ५२० शाळांनी तंबाखूमुक्तचे पुरावे सादर केले नाहीत तर ३४०६ शाळांनी सर्वेक्षणासाठी नोंदणीच केलेली नाही.

याबद्दलचे वृत्त प्रकाशित होताच माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबत पत्र काढले. तंबाखूमुक्त मोहिमेची अंमलबजावणी करण्यात यावी व तंबाखूमुक्त परिसरचे फलक लावावेत, अशा सूचना देणारे पत्र काढले आहे.

Post a Comment

0 Comments