सांगोला तालुक्याची आढावा बैठक घेवून प्रत्येक गावांचा गावभेट दौरा करणार मा.खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना लगेचच फोन लावून याबाबत बोलून तात्काळ अडचण सोडविण्याचा रणजितसिंह नाईक-निंबाळकर प्रयत्न करीत होते.
सांगोला (जि. सोलापूर) : राज्यात राज ठाकरे यांच्या सभेमधील ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या चर्चेनंतर सध्या माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या ‘लाव-रे फोन’ची चर्चा सुरू झाली आहे. सभेमध्येच ते तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सांगोला तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा सोमवारी (ता. ३ ऑक्टोबर) आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, मोहन डोंगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, गजानन भाकरे, अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करुन पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेताना तसेच निवेदन स्वीकारताना प्रत्येकाशी संवाद साधत होते.
त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना लगेचच फोन लावून याबाबत बोलून तात्काळ अडचण सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे पदाधिकारी व कर्मचारी असलेल्या समस्या जागेवरच सोडविल्या जात असल्यामुळे समस्या सांगणाऱ्यांची मोठी गर्दी खासदार निंबाळकर यांच्यासमोर झाली होती.
समस्या सोडविताना संबंधिताचे मोबाईल फोन नंबर ते त्यांनाच विचारून घेत होते. आधिकारी व संबधितांना लाव रे फोन असे सांगत असल्याने 'लाव-रे फोन' ची चर्चा सांगोला तालुक्यात जोरदार सुरू झाली आहे.
एकीकडे बऱ्याच महिन्यांनी सांगोल्यातील समस्या सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवून घेत होते. अशाच अडचणी गाव पातळीवरील सामान्य लोकांचेही प्रश्न जाणून घेऊन सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.
0 Comments