ब्रेकींग : तळे हिप्परगा येथे युवकाचा भोकसून खून ; किरकोळ वादातून घडली घटना ; सोमवारी सकाळची घटना
सोलापूर : सोलापूर तुळजापूर रोडवरील शहरा नजीक असलेल्या तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास युवकाचा खून करण्यात आला. शीख समाजाकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या छातीमध्ये वार करून हा खून झालेला आहे असल्याचे सांगण्यात आले.
रविसिंग सिसपाल सिंग टाक वय 22 असे मयताचे नाव आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ नातेवाईकांनी जखमी अवस्थेत रवीसिंग याला सिव्हील मध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकाची मोठी गर्दी झाली आहे मारेकरी हे त्यांच्याच वस्तीमध्ये रहिवासी असून त्यांना मयताचा भाऊ ओळखतो. दरम्यान जगबीरसिंग टाक या मयताच्या भावाने अधिक माहिती दिली आहे ती काय पहा...
0 Comments