वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात दक्षता हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य उपक्रम उत्साहात संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला येथील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात स्कूल हेल्थ ऍक्टिव्हिटी महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने आरोग्य माहिती शिबिर संपन्न झाले.
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेला चार वर्ष पूर्ण झाल्याने या योजनेची जनजागृती प्रसार व प्रचार होण्यासाठी शालेय आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे उदघाटन संस्था सचिव नीलकंठ शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले. दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले.
17 सप्टेंबर ते 2ऑक्टोंबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा आरोग्य पंधरवाडा असल्याने शालेय आरोग्य उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमांमध्ये दक्षता हॉस्पिटल मधील रुग्ण सुविधा, शस्त्रक्रिया व याचे लाभार्थी याबद्दलची माहिती डॉ. महादेव जगताप यांनी दिली.
डॉ. महादेव श्रीमंत जगताप, आर. एम. ओ. दक्षता हाॅस्पिटल ,
नागनाथ बनसोडे, सुपरवायझर, महात्मा फुले जन आरोग्य योजना,
गौरी चंदनशिवे,आरोग्य मित्र.
महात्मा फुले, जन आरोग्य योजना सुभाष बनसोडे ,आरोग्य मित्र, महात्मा फुले, जन आरोग्य योजना,संदीप किरगत, डाटा ऑपरेटर, महात्मा फुले, आरोग्य योजना. मयुर शेळके, मॅनेजर
दक्षता हाॅस्पिटल सांगोला यांनी
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती यांनी दिली. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष कुंभार सर यांनी केले.
0 Comments