उदनवाडी ता.सांगोला येथे दलित वस्ती (गाडे गल्ली) 1951 पासून विविध सुविधा पासून वंचित....!!!
कोळे / प्रतिनिधी...गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर ; रस्ते, गटार आधी योजना साठी समाज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चा लवकरच ?
सांगोला (प्रतिनिधी): उदनवाडी ग्रामपंचायतची स्थापना १९५१ ची असून गाडे गल्ली पासून आज तागायत रस्ते, गटार, दिवाबत्ती अशा आधी ग्रामपंचायतच्या विविध सुविधा या दलित वस्तीमध्ये दर्जेदार पद्धतीने राबवल्या जाताना दिसत नाहीत.
बऱ्याच कालावधीनंतर वर्षानुवर्ष लोटली गेली. आता गाडे गल्लीतील रस्ता मंजूर होऊन एक महिना उलटून गेला आहे. वर्क ऑर्डर सुद्धा मिळाले आहे. परंतु ग्रामसेवक यांना वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिले जात आहेत. रस्ता कधी सुरू करता असे म्हटल्यानंतर काही बोलले जात नाही. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावा अशी मागणी दलित बांधवांकडून करण्यात येत आहे.
अन्यथा तहसील कार्यालयावर व गटविकास अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा समाज बांधवांच्या वतीने काढण्यात येणार आहे अशी माहिती उदनवाडी येथील समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली.
0 Comments