Breaking News

शिव हिंदुस्तान मित्र मंडळ कोळे ता. सांगोला यांच्यावतीने भव्य अशा मेंढ्या पळवीण्याचा कार्यक्रमाचे आयोजन...

 कोळे / वाहिद आतार...सांगोला तालुक्यामध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर त्यांचा मुख्य व्यवसाय हा मेंढी पालन हा आहे.


 सांगोला तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे अशातच आपले पशुधन वाचवण्यासाठी वन-वन भटकंती त्या बांधवांना वर्षानुवर्षी करावी लागते त्यांची होणारी अवस्था पाहून अशा मेंढपाळ बांधवांचा सत्कार करण्यासाठी शिव हिंदुस्थानचे मित्र मंडळ कोळे यांच्या वतीने भव्य अशा मेंढ्या पळविण्याचा कार्यक्रम आयोजन  केला होता. 

हा मेंढ्या पळवीण्याचा कार्यक्रम कोळे ग्रामपंचायत ते लक्ष्मी मंदिर वीर मंदिर  ह्या ठिकाणी येवून शिवहिंदुस्थान मित्र मंडळ जवळ संपन्न झाला. यावेळी आलेल्या सर्व मेंढपाळ बांधवांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी या मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडेकर, मेजर प्रशांत आलदर, राष्ट्रवादी सांगोला तालुका युवक उपाध्यक्ष असलम पटेल, तुकाराम आमदार (पुढारी), 

आप्पासाहेब सरगर (चेअरमन),विशाल मोरे,महिबुब आतार,दत्ता आलदर,दत्ता पांढरे, तानाजी आलदार ,समाधान बोबडे (सामाजिक कार्यकर्ते),बाळू होनमाने, अण्णा आलदर,मोईन तांबोळी,वासू कोपर्डे,साजिद आतार,शुभम मदने, विठ्ठल पांढरे, प्रदीप आलदर, व सर्व मंडळाचे कार्यकर्ते व कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments