थरारक ! अपघात ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली डोके आल्याने युवकाचा जागीच मृत्यू मंगळवेढ्यातील घटना....
मंगळवेढा शहरात ट्रॅव्हल्सने चालत चाललेल्या युवकाला चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे आज दुपारी 2.30 च्या दरम्यान शहर पोलीस चौकशीच्या शेजारी व हॉटेल राजयोगच्या समोर ही घटना घडली आहे.
रेवनसिध्द उर्फ दयानंद शिवाजी मोठे (वय 34 रा.नंदेश्वर ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोडच्या कडेला गाडी लावून चालत जात असताना पंढरपूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सने उडवले आहे.
यात रेवनसिध्द उर्फ दयानंद मोठे याचा ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली डोके आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकूश वाघमोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव घायाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय येलपले, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान, शहरात अवजड वाहने येण्यास बंदी असताना ट्रॅव्हल्सने शिरकाव केला आहे. यावर वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.
0 Comments