मुख्यमंत्र्यांना जनतेने दिला धोका ! भाषण सुरु असतानाच अर्ध्या लोकांनी घराची वाट धरली
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अनेकजण घरी निघाल्याचं दिसून आलं. लोक कालपासून प्रवासात आहेत. अनेकजण दुपारी मैदानात दाखल झाले आहे. मात्र, सभा लांबत आहे. तसेच मैदान पूर्ण भरल्याने अनेकांना बाहेर रस्त्यावर उभे राहून सभा ऐकावी लागत आहे.
त्यातून लोक लवकर निघून जात आहेत. मैदानावरील लोक देखील उठून जाताना दिसून आलं.बीकेसी मैदानावर बसायला जागा नसल्याने शिंदे यांच्या भाषणापूर्वीच अनेकजण घरी निघाले होते
लोक का निघाले?
बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी लोक दुपारपासून जमले होते. काही जण काल पासून प्रवासात होते. मात्र, सभा लांबत चालल्यानं लोक उठून गेले. काही जण बीकेसीच्या बाहेर थांबून उभे राहून सभा ऐकत होते ते देखील सभा लांबत असल्यानं निघून गेले.
एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांचं भाषण अंतिम टप्प्यात असताना भाषणाला सुरुवात केली. दुपारपासून आलेले लोक सभा लांबू लागल्यानं निघून जाताना दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं भाषण सुरु असतानाच लोक निघून जाताना दिसून आलं.
एकनाथ शिंदे आजच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंना काय उत्तर देणार याची उत्सुकता होती. एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी लोक जमले होते. मात्र, सभा सुरु असतानाच लोक निघून जात असल्याचं पाहायला मिळालं.
0 Comments