google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भोई समाज संघर्ष सेना(सामाजिक संघटना) व न्यू बेलेश्र्वर गणेश मंडळ रोंझाने आयोजित भोई समाज मेळावा उत्साहात सम्पन्न

Breaking News

भोई समाज संघर्ष सेना(सामाजिक संघटना) व न्यू बेलेश्र्वर गणेश मंडळ रोंझाने आयोजित भोई समाज मेळावा उत्साहात सम्पन्न

 भोई समाज संघर्ष सेना(सामाजिक संघटना) व न्यू बेलेश्र्वर गणेश मंडळ रोंझाने आयोजित भोई समाज मेळावा उत्साहात सम्पन्न


नाशिक: स्वप्नराज खेडकर प्रतिनिधी   दि.5/10/22रोजी विजयादशमी च्या मुहूर्त मेळ साधून भोई समाज मेळावा पार पडला. 


या मेळाव्याला भोई समाज संघर्ष सेना चे संस्थापक अध्यक्ष मा श्री नितीनजी भोई साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच भोई समाज संघर्ष सेना चे राज्य महा संघटक मा श्री किसनजी चव्हाण साहेब व महा-राज्य कोषाध्यक्ष अध्यक्ष स्वप्नराज खेडकर साहेब हे प्रमुख उस्थिती म्हणून उपस्थित होते.    

      या मेळाव्या मध्ये अनेक सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली मा.संस्थापक अध्यक्ष बोलत असताना त्यानी समाजात असे छोटे छोटे मेळावे व मिटिंग नेहमी समाज बांधवांनी घायला हव्यात त्यामुळे सामाजिक एकटा व सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत होत

 असते व समाजाला न्याय मिळू शकतो  पुढे बोलतांना त्यानी म्हटले की *भोई समाज संघर्ष सेना* ही संघटना सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी समाज सोबत आहे तसेच समाज बांधवांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. व त्यावर विविध प्रकारचे उपाय काढण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. 

व अनेक मान्यवर यांनी आपले मेळाव्यात संबोधले या मेळाव्याला पुढील प्रमाणे समाज सेवक उपस्थित होते.श्री भास्कर नाना खेडकर.श्री भाऊराव जावरे (माजी सरपंच). श्री मधुकर खेडकर.                    तसेच या मेळाव्याचे नियोजन न्यू बेलेश्र्वर गणेश मंडळ च्या सर्व सभासदानी केले. न्यू बेलेश्र्वर गणेश मंडळाचे सभासद देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमास विष्णू जावरें.समाधान खेडकर,डीगांबर खेडकर.                     दीपक जावरे,प्रविण जावरे.सोमनाथ मोरे,अर्जुन जावरे.दिलीप सातोटे.लखन खेडकर,अशोक वायडे,ऋषिकेश खेडकर.योगेश खेडकर.कृष्णा खेडकर,भगवान मोरे.वाल्मीक खेडकर.ज्ञानेश्वर वायडे. हिरामण वायडे.दिगांबर मोरे.                    सुनील खेडकर ,

चंद्रकांत खेडकर,शांताराम खेडकर.रितेश खेडकर,बंडू वायडे.अर्जुन जावरे.हरीश जावंरे. इत्यादी मंडळाचे सभासद व तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मा श्री स्वप्नराज खेडकर यांच्या वतीने मंडळाला वायर लेस स्पीकर श्री नितीनजी भोई साहेब आणि श्री किसनजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच या मेळाव्याचे सूत्र संचालन श्री देवराम भाऊ वायडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments