फलटण : पोलीस कर्मचाऱ्याची वाढदिवसा दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या
फलटण शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अच्युत जगताप यांनी रविवारी वाढदिवसा दिवशीच पोलीस कॉलनीतील राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अच्युत जगताप यांचा दि. 2 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्यांना फलटण शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्यांनी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे काही पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. मात्र आत मधून कोणताही प्रतिसाद आला नाही.
यावेळी संबंधित पोलीस कर्मचार्यांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी घरामध्ये अच्युत जगताप यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून फलटण शहर पोलीस ठाण्यासह सातारा जिल्हा पोलीस दलात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
0 Comments