google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मटन खाल्ले कुत्र्याने, जीव गेला मुलीचा

Breaking News

मटन खाल्ले कुत्र्याने, जीव गेला मुलीचा

 मटन खाल्ले कुत्र्याने, जीव गेला मुलीचा

उस्मानाबाद (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून बापाने मुलीचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई वडील आपल्या पाल्यासाठी काहीही करायला तयार असतात मात्र उस्मानाबाद मध्ये बापाने मुलीचा जीव घेतला आहे.

कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून बापाने चक्क पोटच्या मुलीवर गोळीबार केला. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली. काजल मनोज शिंदे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काजल माहेरी आली होती. काजलच्या आईने मटण बनवले होते. आणि काजलला लक्ष ठेवण्यास सांगितले होते. 

पण काजलचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्याने मटण खाल्ले. त्यामुळे काजल आणि तिच्या आईमध्ये भांडण झाले. यामुळे रागाच्या भरात काजलचे वडील मनोज शिंदे यांनी गावठी बंदुकीने तिच्यावर गोळी झाडली. गोळी थेट काजलच्या छातीत घुसल्याने काजल गंभीरित्या जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखलकरण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी काजलचे वडील मनोज शिंदे आणि आईला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे. कुत्र्याच मटण खाल्लं म्हणून बापानेच पोटच्या मुलीचा काटा काढला. मानाचा चोचला मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

Post a Comment

0 Comments