google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 इंदापूर पोलिसांची बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई...अकरा जनावरांसह पिकअप वाहन केले जप्त...

Breaking News

इंदापूर पोलिसांची बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई...अकरा जनावरांसह पिकअप वाहन केले जप्त...

 इंदापूर पोलिसांची बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई...अकरा जनावरांसह पिकअप वाहन केले जप्त...

इंदापूर पोलिसांनी बेकायदेशीर कतलींसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर इंदापूरचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17 सप्टेंबर रोजी पहाटे 5.00 वाजण्याच्या सुमारास जुना टेंभुर्णी नाका येथे पिकअप क्र.MH- 10 -Z- 9423 या गाडीत बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी एकूण अकरा जनावरे घेऊन जात असताना यामध्ये दोन देशी गाई व नऊ वासरे अशी जनावरे इंदापूर पोलिसांना आढळून आले.आरोपीकडून अकरा जनावरे व एक पीकअप असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

यामध्ये इंदापूर पोलिसांनी पिकअप चा चालक आणि मालक यांच्याविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे व प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व अकरा जनावरे नीरा नरसिंगपूर येथील गोशाळेमध्ये जमा केली आहेत.

Post a Comment

0 Comments